हा प्रश्न मला विचारला महिकाने. माहित आहे कोणाबद्दल? पोलीस!!!!शाळेत जाताना एक पोलीस मामी गाडीवर दिसल्या. मग महिकाचे सर्व प्रश्न:
- कुठे जात आहेत? (मी: ऑफिस)
- पोलीस काय करतात? (मी: चोर पकडतात, ट्रॅफिक कंट्रोल करतात, आपल्याला मदत करतात)
- ऑफिस मध्ये काय करतात? मीटिंग करतात का? (मी: हो)
- मीटिंग काय करतात? (मी: आज काय काम करायचा ठरवतात, चोर कसे सापडवायचे ह्याचा विचार करतात.)
- चोर कुठे असतात? (मी: लपलेले असतात. आपल्याला नाही कळत. पोलिसांना कळत कोण चोर आहेत ते.)
- चोर कोण आहेत? सगळे चोर आहेत का? (इकडे तिकडे लोकांना दाखवत) हा माणूस, हा माणूस? (मी: नाही गं. कोणी नाहीत. असे सापडत नाहीत.)
- पोलीस काय खातात?
आता हा प्रश्न कमालीचा innocent असला, तरीही मला हसू आले. काय खातात बरं पोलीस??? पण महिकाला पटेल असे उत्तर द्यावे लागले...
मी: अगं आपल्यासारखेच खातात ते, चपाती, भाजी, वरण-भात.
ह्यावर अनेक प्रश्न:
- दूध पितात का?
- दही खातात का?
- काजू खातात का?
- chocolate काजू खातात का?
हे सर्व प्रश्न ऐकून मला भूक लागली!

सुदैवाने ह्या प्रश्नानंतर खाण्याचे प्रश्न संपले. मग तिने विचारले की पोलीस टोपी घालतात का?
हो म्हणाल्यावर लगेच पुढचा प्रश्न... कशी असते टोपी? मला दाखव ना!
थोड्याच अंतरावर एक पोलीस मामा दिसला आणि त्याच्या डोक्यावरची टोपी पण!
मलाच हूश वाटलं!!!
No comments:
Post a Comment